तारेन्द्र बोर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धा व रुग्णवाहिका लोकापर्ण सोहळा

माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते मॅराथॉन विजेत्याना बक्षीस वितरण

जितेंद्र कोठारी, वणी: वणीचे माजी नगराध्यक्ष व भारतीय जनता पार्टी युवामोर्चा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सोमवार 4 एप्रिल रोजी भव्य मॅराथॉन स्पर्धा व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तारेन्द्र बोर्डे मित्र परिवार व उडान अकेडमीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  मॅराथॉन विजेत्याना माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

वणी येथील टिळकचौकातून सकाळी 7 वाजता मॅराथॉन स्पर्धेची सुरवात होणार आहे. टिळक चौक ते मुकूटबन टी पॉइंट ते गणेशपूर ते परत टिळक चौक पर्यन्त होणाऱ्या या स्पर्धेच्या प्रथम विजेत्याला 10 हजार रुपये, दुसऱ्या विजेत्याला 7 हजार व तृतीय विजेत्याला 5 हजारचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. यावेळी मान्यवरांचे हस्ते अॅम्ब्युलेन्सचे लोकार्पणही करण्यात येणार आहे. भव्य मॅराथॉन स्पर्धेत वणी शहरातील जास्तीत जास्त नागरिकानी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments are closed.