गोरक्षनाच्या मालकीच्या गोधनाची कोंडवाडा चालकाकडून परस्पर विक्री
वणी (विवेक तोटेवार): बुधवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास वणीतील जैन स्थानक जवळील कोंडवडा चालकाकडून एक गाय, एक गोऱ्याची व एका कालवडाची विक्री करून गाडीत घेऊन जात असताना काही सामाजिक संघटनांद्वारे रंगेहात पकडण्यात आले आहे. यामध्ये आरोपी राहुल दुर्वास निखाडे वय 22 वर्ष, कपील जनार्धन चटारे वय 26 वर्ष, विलास सोमेश्वर थेरे वय 32 वर्ष तिन्ही चिखलगाव येथील रहिवासी असून गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
पोलिसांनी या तिन्ही आरोपीस अटक करून त्यांच्यावर कलम 406 ,34 भा द वि व सहकलम11 (1)(घ) (ड),(झ) प्राण्यांना क्रूरतापूर्वक वागणूक प्रतिबंधक कायदा ,सहकलम 83/77 मोटार वेहिकल कायदा व 119 महाराष्ट्र पोलीस कायद्यनुसार सदर गुन्ह्यात वापरण्यात येणारे वाहन टाटा एस क्रमांक एम इह 29 टी 6170 वाहन ताब्यात घेण्यात आले आहे .आज तिन्ही आरोपीने न्यायालयाने यवतमाळ येथील न्यायालयीन कोठडी दिली आहे. या प्रकरणात मिळून आलेले गोधन गोरक्षण वणी येथे पाठविण्यात आले आहे.
सदर गोधन हे गोरक्षण समिती वणी यांच्या मालकीचे होते. हे गोधन विकण्याचा अधिकार कोंडवाडा चालकास कुणी दिला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आज ही पोलिसांना गवसले नाही. त्यांना शह देण्याचे काम प्रशासन करीत तर नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या अगोदर पालकर यांनीही अशी तक्रार केली होती. परंतु प्रशासनाकडून कोणतेही ठोस पावले उचलली गेली नाही. याबाबत आरोपीस कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी विविध संघटनेकडून होत आहे.
सदर कोंडवाड्यातून अशाच प्रकारे मोकाट जनावरांना पकडून कत्तलीसाठी विकल्या जातेअशी चर्चा वणीकर जनतेत होत आहे. या गुन्ह्यातील महत्वाची बाब म्हणजे कोंडवाडा चालकाने आपल्या कोंडवड्याच्या पावत्या गोधन घेणाऱ्यास दिल्या. याचा अर्थ असा होतो की सदर गोधन हे कोंडवाडा चालकाच्या मालकीचे आहे व ती पावती कुणी पोलिसांना किंवा सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांस दाखवून दिशाभूल केल्या जात होती. त्यामुळे गोधनाची तस्करी करणार्यांना कोणताही अडथडा येत नव्हता.