कोतवाल संघटना अन्नत्याग आंदोलनाच्या पवित्र्यात

मारेगाव येथील कोतवाल, पोलीस पाटील निलंबन प्रकरण 

0
रवि ढुमणे, वणी: मारेगाव तालुक्यातील फवारणीतून विषबाधा झालेल्या घटनेचे खापर कोतवाल व पोलीस पाटील यांच्यावर फोडत मारेगाव तहसीलदारांनी त्यांना निलंबित केले. परिणामी तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या कोतवालांवर उपासमारीची पाळी आली. याविरुद्ध कोतवाल संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालय गाठत निलंबन रद्द करण्यासंबंधीचे निवेदन दिले. निलंबन रद्द न झाल्यास येत्या 6 नोव्हेंबर पासून अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा गर्भित इशारा दिला आहे.
मारेगाव तालुक्यातील फवारणीतून विषबाधा होऊन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती.  सदर घटना घडल्याची कोतवालानी प्रशासनाला तोंडी माहिती पुरवली होती.  कोतवाल हा अल्पशा मानधनावर काम करणारा घटक आहे. ५ हजार रुपये दरमहा व चप्पल खर्च दहा रुपये. अश्या मानधनावर काम करणाऱ्या  निमसटकर,पेंदोर आत्राम या तिघांना जबाबदार धरीत तहसीलदार विजय साळवे यांनी निलंबित केले.
या घटनेने कोतवाल तसेच गाव स्तरावर कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस पाटील हे पुरते हादरून गेले आहे. या संबंधी वणी बहुगुणी न्यूज पोर्टलने ने पाठपुरावा करून वृत्तांकन केले.  कोतवाल निलंबन प्रकरणाची दखल कोतवाल संघटनेने घेत निलंबन रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले.
अन्यथा अन्नत्याग आंदोलन छेडणार
मारेगाव तालुक्यातील विषबाधा प्रकरणात कोतवाल निलंबित झाले. त्यांचे निलंबन रद्द करून सेवा पुस्तिकेत कोणतीही नोंद न करता त्यांचे निलंबन रद्द करण्यात यावे. अशी मागणी त्यांनी केली आहे. निलंबन रद्द न झाल्यास येत्या 6 नोव्हेंबर पासून अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. यावेळी जिल्ह्यातील कोतवाल संघटनेचे पदाधिकारी व कोतवाल उपस्थित होते
Leave A Reply

Your email address will not be published.