छत्रपती महोत्सवात कोविड योद्ध्यांचा सत्कार

वणीत मराठा सेवा संघातर्फे शिवजयंती साजरी

0

जब्बार चीनी, वणी: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान राखत मराठा सेवा संघाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करून उत्सवप्रेमी लोकांपुढे एक आदर्श निर्माण केला. दरवर्षीप्रमाणे शिवतीर्थावर होणारा जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम रद्द करून अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कोरोनासंबधी सूचनांचे पालन करून हा सोहळा साधनकरवाडीस्थित कुणबी समाज सांस्कृतिक भवनामध्ये संपन्न झाला. यावेळी विचारपीठावर अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर, रंगनाथ स्वामी नागरी सह.बँक वणीचे अध्यक्ष ऍड.देविदास काळे, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष भारती राजपूत,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, पोलीस स्टेशन वणीचे ठाणेदार वैभव जाधव,आयुष विभागाचे प्रमुख डॉ.विवेक गोफने उपस्थित होते.

या छत्रपती महोत्सवाच्या निमित्ताने कोरोनासारख्या कठीण काळात आपल्या प्राणाची पर्वा न करता ज्यांनी अहोरात्र सेवा दिली अशा कोविड योद्धयांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठा सेवा संघाने त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते.याप्रसंगी डॉक्टर्स टीम, नर्सेस टीम, एमपीडब्ल्यू वर्कर्स,अंत्यविधी सारखे संस्कार पार पाडणारी टीम,पोलीस विभागातील कर्मचारी तसेच, वणी शहरातील बाधित क्षेत्रात निर्जंतूकीकरण मोहीम राबवणारी टीम यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि शिवधर्म दिनदर्शिका देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी पो. स्टे. वणीचे ठाणेदार वैभव जाधव, आयुष विभागाचे प्रमुख डॉ.विवेक गोफने, स्वागताध्यक्ष ऍड. देविदास काळे या मान्यवरांनी मराठा सेवा संघाच्या या अभिनव संकल्पनेचे जाहीर कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना महामानवांनी सुरु केलेली समाजप्रबोधनाची परंपरा अबाधित आणि अखंडित राहावी, यासाठीच दरवर्षी मराठा सेवा संघ छत्रपती महोत्सवाचे आयोजन करीत असते, अशी भूमिका मंगेश खामनकर यांनी मांडली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मसेसंघाचे उपाध्यक्ष प्रदीप बोरकुटे आणि आभार प्रदर्शन मसेसंघाचे सचिव नितीन मोवाडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद बोबडे, मारोती जिवतोडे, विजय राजूरकर,दत्ता डोहे,अमोल टोंगे, लक्ष्मण काकडे,ऋषीकांत पेचे, वसंत थेटे,,सुरेंद्र घागे,संजय गोडे,विलास शेरकी, संदीप गोहोकर,मारोती मोडक, शंकर पुनवटकर,नरेंद्र गायकवाड शेखर वऱ्हाटे अर्णव बोरकुटे, स्वराजित डोहे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा:

वणी तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी

परदेशी मॉडेलसारखी सजवली जाते कॉलगर्ल (भाग 6)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.