महत्त्वाची बातमी: कृषी सेवा केंद्र. गुरूवारपासून 3 दिवस बंद

2,3 व 4 तारखेपर्यंत तीन दिवस सर्व कृषी दुकाने बंद राहतील

 

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्र शासनाच्या नवीन प्रस्तावित कृषी कायदा विधेयकातील कृषी हिताला बाधा आणणाऱ्या जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्तावित कायदे रद्द करण्यासाठी कृषी सेवा केंद्र संचालकांनी बंद पुकारला आहे. ऐन रब्बी हंगामात येत्या गुरुवारी दि 2 ते शनिवार 4 नोव्हेंबर असे 3 दिवस संपूर्ण तालुक्यातील कृषी सेवा केंद्र बंद राहणार आहे. याबाबत 31 ऑक्टो. रोजी वणी तालुका कृषी साहित्य विक्रेता संघटना तर्फे निवेदन देण्यात आले.

राज्य सरकार कृषी केंद्रचालकांच्या विरोधात चार नवे कायदे आणत आहे. बोगस, अवैध निविष्ठा विक्री प्रकरणात कृषी विक्रेत्यांनाही दोषी ठरवीत त्यांच्याविरोधात नव्या कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची तरतुद यामध्ये करण्यात आली आहे.
या कायद्यांना राज्यभरातील कृषी केंद्र संचालकांचा जोरदार विरोध आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात कृषी केंद्र संचालकांच्या संघटनेने तीन दिवसांच्या राज्यव्यापी बंदची घोषणा केली आहे.

वणी शहरात तब्बल 70 आणि तालुक्यात 130 कृषी सेवा केंद्र आहेत. तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र येत्या 2,3 व 4 तारखेपर्यंत बंद राहतील याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. असे आवाहन वणी तालुका कृषी साहित्य विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय गारघाटे यांनी केले आहे.

नवीन कृषी कायदे रद्द करणे व 3 दिवस दुकाने बंद ठेवण्याबाबत उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व कृषी विभाग पं. स. वणी यांना निवेदन देताना वणी तालुका कृषी साहित्य विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय गारघाटे, उपाध्यक्ष देवराव काकडे, शांतीलाल जैन, सचिव सागर धवणे, सचिन गुंजेकर, नंदकुमार धात्रक, प्रशांत पाचभाई, किशोर खाडे, भूषण कोंडावार, उमेश राजूरकर, लोकेश उपरे, मंगेश कावडे व इतर कृषी केंद्र संचालक उपस्थित होते.

Comments are closed.