संतोष ढुमणे, वणी: कुणबी समाजाला क्रिमिलिअर अटीतून वगळावे या मागणीसाठी समस्त कुणबी समाजातर्फे गुरूवारी दि. 26/10/17 ला मा. उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत मा. सहसचिव विजा भज इमाव व विमाप्र कल्याण विभाग यांना निवेदन देण्यात आले. त्यात क्रिमीलियर तत्वातून कुणबी जातीला वगळण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे.
कुणबी समाज महाराष्ट्र राज्यात पूर्वीपासून शेतीशी निगडित समाज असल्याने तो आर्थिक व सामाजिक दृष्ट्या पूर्णपणे मागासलेला आहे. कोणत्याच संदर्भात महाराष्ट्र राज्यातील कुणबी समाज संपन्न किंवा वैभवशाली जीवन जगत नाही. म्हणून कुणबी समाजाला क्रिमिलियर अटीतून वगळावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना प्रभाकर सूर, जगदीश ढोके ,सचिन पिंपळकर , संतोष ढूमणे, विकास जेणेकर , मारोती महातळे , दिलीप गोहोकार , विकास देवतळे , प्रदीप बोरकुटे , अजय धोबे , अमोल टोंगे , देवेन्द्र खरवडे, रुपेश ठाकरे , जगन जुनगरी , हरीश पिदूरकर , यांच्या सहीत अनेक समाजबांधव उपस्थित होते.