विजय उपाध्ये यांना विद्यापीठाचा सेवागौरव पुरस्कार.

0
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिक विजय शंकरराव उपाध्ये ह्यांना ह्या वर्षी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी वर्गवारीतील उत्कृष्ट सेवागौरव पुरस्कार घोषित झालेला आहे.

 

विद्यापीठातर्फे प्रतिवर्षी विविध क्षेत्रांत अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाविद्यालय तथा कर्मचार्‍यांचा  उत्कृष्ट सेवागौरव पुरस्काराने सन्मान केला जातो. यावर्षी हा मान वणीला मिळालेला आहे हे वैशिष्ट्यपूर्ण.

 

विजय उपाध्ये यांनी संगणकीकरणाच्या क्षेत्रात स्कॉलरशिपचे चेक कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील टी. सी. नवीन सुरु झालेल्या सत्र पद्धतीतील परीक्षेतील कंट्रोलशीट, मार्कशीट या सगळ्यांना संगणकाद्वारे ऑटोमॅटिक प्रिंट करण्याशी संबंधित विविध सॉफ्टवेअरची निर्मिती करून या क्षेत्रात दाखवलेली वेगळी दृष्टी आणि दिलेले वैशिष्ट्यपूर्ण योगदान या आधारे हा पुरस्कार घोषित झालेला आहे.

 

महाराष्ट्रदिनी विद्यापीठात आयोजित करण्यात येत असलेल्या भव्य कार्यक्रमात त्यांना मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अशा स्वरूपातील पुरस्कार वणी सारख्या तालुकास्तरावर पहिल्यांदाच मिळत असल्याने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला, सर्व संचालक मंडळ तथा कार्यकारी प्राचार्य विजय वाघमारे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपाध्ये यांचे विशेष अभिनंदन केले. अशाच प्रकारे विविध सॉफ्टवेअरची निर्मिती करून महाविद्यालयाचे प्रत्येक काम सुटसुटीत बिनचूक आणि आकर्षक करण्यासाठी मी अधिकाधिक प्रयत्न करीन त्यासाठी हा पुरस्कार मला प्रेरणादायी आहे असे मत विजय उपाध्ये यांनी व्यक्त केले.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.