वणी परिसरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांच्या धाडी

चौघे ताब्यात, अवैध धंद्यांविरोधात मोहीम; नगदी मुद्देमाल जप्त

विवेक तोटेवार, वणी: शहरातील लालगुडा चौफुली व ज्योती बार गल्ली परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर वणी पोलिसांनी धाड टाकून चार आरोपींवर जुगार कायद्यांतर्गत कारवाई केली. ही कारवाई दि. 24 एप्रिल 2026 व 08 मे 2026 रोजी करण्यात आली. या प्रकरणात गोपी किसन लोणारे (रा. रामपुरा वार्ड, वणी), अमित किसन घेडांगे (रा. भाग्यशाली नगर, वणी), मंगेश बबन बदखल (रा. भालर) आणि अजय बलेश्वर मांझी (रा. रंगनाथ नगर, वणी) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 7 हजार 160 रुपयांचा नगदी मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध जुगार अड्ड्यांवर सातत्याने माहिती संकलन करून विशेष पथकांच्या माध्यमातून कारवाया सुरू असल्याचे वणी पोलीस प्रशासनाने सांगितले. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने आगामी काळातही अशा धाडी अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकारांची माहिती नागरिकांनी पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वणी यांनी केले आहे.

Comments are closed.