समर क्लास: 12 मे पासून स्पोकन इंग्लिश क्लासला सुरुवात

वणीत 25 दिवसांचा स्पोकन इंग्लिश फाउंडेशन कोर्स

बहुगुणी डेस्क, वणी: विद्यार्थी, युवक तसेच नोकरी व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी स्पोकन इंग्लिश क्लासेसतर्फे 25 दिवसांचा इंग्रजी फाउंडेशन कोर्स आयोजित करण्यात आला आहे. या कोर्सला दि. 12 मे 2026 पासून सुरुवात होणार असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर कोर्स दि. 12 मे ते 6 जून 2026 या कालावधीत घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दोन बॅच ठेवण्यात आल्या असून, पहिली बॅच सकाळी 7 ते 10 आणि दुसरी बॅच सायंकाळी 5 ते 8 या वेळेत होणार आहे. अधिक माहितीसाठी सागर देविदास जाधव (M.A. Eng., M.A. Eco., B.Ed.) यांच्याशी 7038204209 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

या फाउंडेशन कोर्समध्ये बेसिक ग्रामर, स्पीकिंग प्रॅक्टिस, प्रश्नोत्तर सराव, उच्चार सुधारणा, शब्दसंग्रह वाढविणे तसेच इंग्रजी व मराठी वाचन-लेखनावर विशेष भर दिला जाणार आहे. याशिवाय पिक्चर डिस्क्रिप्शन, ग्रुप डिस्कशन, स्टोरी रायटिंग आणि कन्व्हर्सेशनल प्रॅक्टिससारखे उपक्रमही घेण्यात येणार आहेत. कोर्ससाठी कोणतीही वयोमर्यादा नसून मर्यादित जागा उपलब्ध असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हे क्लासेस K.V.C. Heights Building, न्यू महाराष्ट्र बँकेच्या वर, टागोर चौक, वणी येथे आयोजित करण्यात आले आहेत.

Comments are closed.