लालगुडा येथे कोविड-19 लसीकरण शिबिर

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते उद्घाटन

0

जितेंद्र कोठारी, वणी : प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर अंतर्गत ग्राम पंचायत लालगुडा येथे शुक्रवार 4 मे रोजी कोविड-19 लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले.

सीकरण शिबिराला लालगुडा येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात तब्बल 70 लाभार्थ्यांना कोविशिल्ड व्हॅक्सीनचा पहिला डोज देण्यात आला. कोविड-19 शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारसह पंचायत समिती सभापती संजय पिंपलशेंडे,

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

उपसभापती चंद्रज्योती शेंडे, जि. प. सदस्य बंडू चांदेकर, गटविकास अधिकारी राजेश गायनार, आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण बोडके, लालगुडा ग्रामपंचायत सरपंच धनपाल चालखुरे, उपसरपंच नीलेश कोरवते, ग्रामसेवक पुरुषोत्तम फुलझेले, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेंडे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

हेदेखील वाचा

अजब भूमिअभिलेख कार्यालयाचा गजब प्रकार

हेदेखील वाचा

खर्रा घोटत असताना ब्राह्मणी येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू

हेदेखील वाचा.

गणेशपूर येथे सुरक्षा गार्डची गळफास घेऊन आत्महत्या

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.