लालगुडा येथील तरुण महिला सरपंचाचा अकस्मात मृत्यू

मृत्यूचे कारण अस्पष्ट, परिसरात हळहळ व्यक्त

0

रवि ढुमणे, वणी: वणी शहरालगत असलेल्या लालगुडा ग्रामपंचायतच्या महिला सरपंचाचा चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारला घडली आहे.

Podar School 2025

तालुक्यातील लालगुडा ग्रामपंचायतीच्या सरपंच मीना बुरडकर (३५) यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना चंद्रपूर येथील डॉ झाडे यांच्या इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मीना बुरडकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्याची तयारी सुद्धा कुटुंबीयांनी केली होती. गेली सात दिवस डॉक्टरांनी विविध तपासण्या केल्या. त्यावर उपचार सुद्धा केलेत परंतु त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. अखेर त्यांना बुधवारला सायंकाळी सात वाजताचे सुमारास नागपूरला उपचारासाठी न्यायचं ठरलं. पण तिथे नेण्याआधीच मृत्यू झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या दुर्दैवी घटनेने लालगुडा गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सरपंच मीना बुरडकर यांचा मृत्यू नेमका कोणत्या आजाराने झाला आहे याचे कारण अस्पस्ट असले तरी त्यांना स्वाईन फ्ल्यू झाला असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती.

डॉक्टरांनी निमोनिया झाल्याचे कारण स्पष्ट केले होते. मीना बुरडकर यांच्या आजाराचे दस्तऐवज डॉक्टरकडे असल्याने मृत्यूचे कारण गुलदस्त्यातच आहे. एकूणच तरुण तडफदार महिला सरपंच असलेल्या मीना बुरडकर यांच्या अकस्मात मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.