मारेगाव बसस्थानकाचं भिजत घोंगडं

तालुक्याचं ठिकाण असून बसस्थानक नाही, आमदार ठरले अपयशी

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव हे तालुक्याचं ठिकाण आहे. सुमारे सव्वाशे गावं या तालुक्यात आहे मात्र हा तालुका अजुनही बसस्थानकाविनाच आहे. आमदारांनी बसस्थानकाच्या जागेचं भूमीपूजन केल्याचं बोललं जातंय मात्र पुढे काहीही प्रक्रिया समोर गेल्याचं दिसत नाही. त्यामुळे हे आमदार संजीवरेड्डी बोतकुरवार यांचं एक प्रकारे अपयश असल्याचं बोललं जातंय.

गेल्या महिन्यात खुद्द आमदारांनी  परिवहण मंत्री दिवाकर रावतेंकडे मारेगाव बसस्थानकासाठी जागा उपलब्ध करुन द्या म्हणून निवेदन सादर केले. वास्तविक पाहता जागा उपलब्ध करणे हे स्थानिक लोकप्रतिनिधीचे काम असते आणि परिवहन मंत्र्यानी त्यावर मंजुरी देऊन कामे मार्गी लावण्या संदर्भात कृती करावयाची असते. मात्र यात आमदार पूर्णपणे अपयशी ठरले.

मारेगाव येथील बसस्थानकाचा प्रश्न आजचा नाही,
गेल्या अनेक वर्षांपासून बसस्थानकाचा प्रश्न प्रलंबित आहे. सध्या  ज्याठिकाणी  बस थांबा आहे तिथे अनेक व्यवसायिकानी अतिक्रमण केलं आहे. त्यामुळे प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊनच बसची वाट पाहिल्या शिवाय पर्याय नाही. महिलासाठी स्वच्छतागृहे नसल्याने महिलाची कुचंबना होत आहे.

शहरातुन चौपदरी हायवे गेला असून बसथांब्याच्या तीनशेे मीटर दुर शेड उभे केले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्या नवीन शेडचा कोणताच फायदा होत नाही. अनेकांनी बसस्थानकासाठी निवेदन, आंदोलने केले. मात्र लोकप्रतिनिधींना हा प्रश्न सोडवण्यात अपयश आलंय. त्यामुळे आता मारेगाववासियांनी लोकप्रतिनिधींकडून आशा सोडली असून ही समस्ये आता खुद्द परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी लक्ष घालून सोडवावी. अशी अपेक्षा मारेगाववासी करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.