सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात ‘माझे लसीकरण, माझे संरक्षण…’ या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या अभियानांतर्ग झरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन मुंडकर हे स्वतः आपले कर्मचारी घेऊन गावागावात जाऊन तरुण युवकपासून तर वृद्धांपर्यंत तर महिलांना कोविड लसीबाबत जनजागृती करत फिरत आहेत. लस घेतल्याने कोणते फायदे होतात, लसीचे दुष्परिणाम नाही,लस घेतल्याने शरीरावर काय फायदा होतो व इतर संपूर्ण माहिती देत आहे.
गटविकास अधिकारी मुंडकर यांनी 17 जून रोजी माथार्जुन, गवारा, पिवरडोल या गावात जाऊन ग्रामपंचायत मध्ये बैठक तर गावातील एखाद्या झाडाखाली बसवून कोविड लसीबाबत माहिती देऊन जनजागृती करीत आहे. तसेच तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक पात्र नागरिकांनी कोविड 19 ची लास घेऊन स्वतःला सुरक्षित करावे असे आवाहन सुद्धा मुंडकर यांनी केले आहे.
कोविड 19 या आजारापासून सुरक्षित राहण्याकरिता व आजारापासून बचाव करिता सर्व जनतेनी लस घेणे आवश्यक आहे. याकरिता जिल्हा प्रशासन सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीन भागातील ज्या लोकांनी कोविडची लस घेतली नाही अश्या सर्व जनतेला लस घेण्याकरिता आवाहन करण्यात आले आहे. तर जिल्हाधिकारी यांनी ‘माझे लसीकरण सर्वांचे संरक्षण, सर्वांचे लसीकरण, माझे संरक्षण’ योजने अंतर्गत ग्रामीण भागातील पात्र लोकांना लसीकरण करीता जागृत करून लस घेण्यास प्रवृत्त करण्याचे कार्य प्रशासनाने हाती घेतला आहे.
ग्रामीण भागातील जनतेत कोविड लसीबाबत विविध शंका निर्माण झाल्याने लसीकरण कमी प्रमाणात होत आहे. अश्या लोकांच्या मनातील शंका दूर करून लस घेण्याकरिता जनजागृती करण्याचे व जनतेला लस घेण्यास प्रवृत्त करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. तालुका पातळीवर तहसीलदार, गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, ब्लॉक मिशन व्यवस्थापन वव तालुका वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गावपातळीवर गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तलाठी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, कोतवाल यांनी सुद्धा गावात जनजागृती करून गावात 100 टक्के लसीकरण केले पाहिजे याकरिता प्रबोधन करून जनतेला लसीकरण करीत तयार करावे अशी संकल्पना जिल्हाधिकारी यांनी मांडली आहे.
हे देखील वाचलंत का?