गर्भवती वाघिणीच्या शिकार प्रकरणी आणखी 5 आरोपींना अटक

मध्यरात्री विशेष पथकाने टाकली वरपोड येथे धाड, या आधी करण्यात आली होती 2 आरोपींना अटक

0

सुशील ओझा, झरी: मांगुर्ला जंगल परिसरातील गर्भवती वाघिणीच्या हत्येप्रकरणी प्रकरणी आज दिनांक 19 जून रोजी पहाटे 2.30 वाजताच्या सुमारास 5 आरोपींना अटक करण्यात आली. नागोराव भास्कर टेकाम, सोनु भवानी टेकाम, गोली रामा टेकाम, बोनु तुकाराम टेकाम, तुकाराम भवानी टेकाम असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे सर्व आरोपी वरपोड येथील रहिवाशी आहेत. याआधी या प्रकऱणी दुभाटी येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. मांगुर्ला येथे वाघिणीच्या हत्येमुळे केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. ही हत्या इतकी निर्घृण होती हत्या करणा-यांनी गुहेसमोर आग लावली व वाघिणीचे दोन्ही पंजे तोडून नेले होते. विशेष म्हणजे ही वाघिण दोन महिन्याची गर्भवती होती. पोलीस आणि वनविभागाच्या संयुक्त पथकाने सदर कारवाई केली.

पांढरकवडा वनविभागाच्या मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला जवळ वन क्रमांक 30 मध्ये 25 एप्रिल रोजी एका नाल्याच्या जवळील एका गुहेत एक वाघिण मृत अवस्थेत असल्याचे उघडकीस आले होते. वाघिणीच्या गळ्यात फास आढळला व तिच्या शरीरावर हत्याराने वार केल्याचे आढळून आले होते. वाघिणीच्या पुढच्या पायाचे दोन्ही पंजे गायब होते. त्यामुळे शिकारीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात होती.

शेकडोंच्या फौजफाट्यासह गावात धाड
या प्रकरणी आधी 2 आरोपींना दुभाटी येथून अटक करण्यात आली होती. यावेळी गावात यवतमाळ, मुकुटबन, शिरपूर, पाटण, वणी येथील पोलीस कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार, एलसीबी पथकाचे प्रमुख हे देखील यावेळी उपस्थित होते. सुमारे 20 ते 25 चारचाकी वाहणांचा व सुमारे 100 च्या वर कर्मचा-यांचा फौजफाटा दुपारी पांढरवाणी गावात दाखल झाला होता. यावेळी ही हीच पद्धती वापरण्यात आली. मोठा फौजफाटा घेऊन ताफा मध्यरात्री 2.30 वाजताच्या सुमारास वरपोड या गावी पोहोचला व तिथे कोम्बिंग ऑपरेशन रावबत पथकाने सर्व आरोपींना अटक केली. या प्रकरणी मुकुटबन पोलिसांनी विशेष कामगिरी केली होती. त्याबद्दल त्यांना बक्षीस देखील देण्यात आले होते.

सदर कार्यवाही किरण जगताप, उपवनसंरक्षक पांढरकवडा वनविभाग पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली. एस आर. दुमोरे सहा वनसंरक्षक (जंकास व कॅम्पा) पांढरकवडा, विक्रांत खाडे, विजय वारे, माधव आडे, रणजीत जाधव, कु. संगिता कोकणे, तुळशीराम साळुंके, सुनिल मेहरे, आशिष वासनिक, गेडाम, सोनडवले, सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, पोलीस निरिक्षक धर्मा सोनुने मुकुटबन, कु. संगिता हेलोंडे सहा. पोलीस निरिक्षक पाटण, तसेच इतर पोलिस व वन कर्मचारी यांनी केली.

हे वाचलंत का? :

वणीतील रविनगर येथील घर (ड्युप्लेक्स) विकणे आहे

सर्वात कमी किमतीत शेतीच्या कुंपणासाठी झटका मशिन उपलब्ध

Leave A Reply

Your email address will not be published.