सट्टेबाजांवर एलसीबीची कारवाई, 3 जणांना अटक

वागद-याजवळ सुरु होता आयपीएलवर सट्टा

विवेक तोटेवार, वणी: आयपीएलच्या मॅचवर सट्टा घेणा-या तिन सट्टेबाजांना अटक करण्यात आली. मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास वागदरा जवळ ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेतर्फे ही कारवाई करण्यात आली. वणी परिसरात मोठ्या प्रमाणात सट्टा बाजार सुरु आहे. मात्र अद्याप ही पहिलीच कारवाई आहे.

Podar School 2025

आयपीएलचा 17 वा सिजन सुरू आहे. मंगळवारी दिनांक 16 एप्रिल रोजी के. के. आर विरुध्द राजस्थान रॉयल्स हा सामना होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला वागदरा जवळ काही इसम या सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली. माहितीवरून हे पथक रात्री 10 वाजताच्या सुमारास गावालगत असलेल्या हनुमान मंदिराजवळ गेले. तिथे त्यांना काही लोक संशयास्पदरित्या आढळले. त्यांची तपासणी व चौकशी केली असता ते क्रिकेट सामान्यावर सट्टा घेत असल्याचे आढळून आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पथकाने मधुकर तात्याजी पारखी, (३८) रा. रामपुरा वार्ड वणी, अरविंद जनार्धन गोहोकार, (३९) रा. शास्त्रीनगर वणी, आशिष रमेश मेश्राम, (२२) रा. रामपुरा वार्ड वणी अशा तिघांना अटक केली. त्यांच्याकडून ०५ मोबाईल फोन, नगदी ४,८०० व ०१ मोटार सायकल असा एकुण १,०६,८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या तिन्ही आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये कारवाई नोंद करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, आधारसिंग सोनोने पो.नि. स्थागुशा यांचे मार्गदर्शनात सपोनि विवेक देशमुख, सपोनि अमोल मुडे, पोउपनि रामेश्वर कांडुरे, पोउपनि धनराज हाके, पोलीस अंमलदार, से साजीद, अजय डोळे, रितुराज मेडवे, रुपेश पाली, निलेश राठोड, योगेश टेकाम, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Comments are closed.