एलसीबीच्या पथकाची शहरात ठिकठिकाणी धाड

हॉटेल, ढाबा व कॅफेवर एलसीबी पथकाची कारवाई

0

जितेंद्र कोठारी, वणी: ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लावण्यात आलेले लॉकडाऊनचे नियम तोडत असल्या प्रकरणी शहरात 7 ठिकाणी एलसीबीतर्फे कारवाई करण्यात आली. मंगळवार 1 जून रोजी सायंकाळी 8 वाजता दरम्यान ही कार्यवाही करण्यात आली. यात एक सेल, दोन चिकन सेंटर, तीन धाबे व एका कॅफेचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार खाद्य पदार्थ विक्रेत्यांना सकाळी 7 ते रात्री 8 वाजे पर्यंत घरपोच पार्सल सुविधाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र शहरातील बहुतांश हॉटेल, ढाबा, व उपहारगृहमध्ये सर्रास आदेशाचे उल्लंघन करुन ग्राहकांना टेबलावर बसवून सेवा देत आहेत. याबाबत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) यवतमाळचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना गुप्त माहिती मिळाली होती. माहितीवरून एलसीबी पथकाने मंगळवारी सायंकाळी 7 वाजता स्थानिक पोलीस व नगर परिषद पथकासह धाडसत्र अवलंबिले.

या कारवाई अंतर्गत एलसीबी पथकाने एक सेल, दोन चिकन सेंटर, तीन धाबे व एका कॅफेवर धाड टाकली. यात सर्व ठिकाणी ग्राहक आढळले. यावरून एलसीबी पथकाने वरील सर्व दुकानाचे मालक व दुकानात असलेल्या ग्राहकांचे नाव नोंद करून पुढील कार्यवाहीसाठी वणी पोलिसात तक्रार दिली.

सदर कार्यवाही स्थानिक गुन्हा शाखा प्रमुख पोनि प्रदीप परदेशी, पोनि वैभव जाधव, सपोनि विवेक देशमुख, पीएसआय शिवाजी टिपूर्णे, नगर परिषद कर्मचारी धम्मरत्न पाटील, विजय महाकुलकार, डीबी पथकाचे सुनील खंडागळे, पंकज उंबरकर, वांडर्सवार यांनी केली.

कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे भंग केल्यावरून नगरपरिषद तर्फे बुधवारी वरील हॉटेल, ढाबा व कॅफे मालक विरुद्द वणी पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार नोंदविण्यात येईल
:रवींद्र कापशिकर, प्रभारी मुख्याधिकारी, न.प. वणी

हे देखील वाचा:

एकल दुकानामुळे उडाला गोंधळ, एकल दुकाने म्हणजे काय?

तालुक्याची कोरोनामुक्ती झपाट्याने वाटचाल, आज 3 रुग्ण

Leave A Reply

Your email address will not be published.