आज वणीत सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. हरी नरके यांचे व्याख्यान

गव्हर्नमेंट हायस्कूच्या प्रांगणात रंगणार व्याख्यान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. हरी नरके यांचे आज मंगळवारी संध्याकाळी 6.30 वाजता वणीत डॉ. हरी नरके यांचे व्याख्याने होणार आहे. गव्हर्नमेंट हायस्कूच्या प्रांगणात हे व्याख्यान रंगणार आहे. राष्ट्रहितासाठी OBC (VJ, NT, SBC) ची जनगणना करणे काळाची गरज! या विषयावर ते आपले विचार मांडणार आहेत. बेलदार समाज बहू उद्देशिय संस्था, वणीच्या वतीने स्वातंत्र्य सेनानी व महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंती निमित्त या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बेलदार समाज बहूउद्देशिय संस्था, वणीचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार यांनी केले आहे.

Podar School 2025

Comments are closed.