सेवानिवृत्त शिक्षक लीलाधरराव खडसे यांचे निधन
आज स, 11 वा. विनायक नगर येथील राहत्या घरून अंत्ययात्रा
बहुगुणी डेस्क, वणी: सेवानिवृत्त शिक्षक व वणीतील विनायक नगर येथील रहिवासी असलेले लीलाधरराव महादेवराव खडसे यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून त्यांच्यावर उपचार सुरु होता. मंगळवारी दिनांक 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज बुधवारी सकाळी 11 वाजता पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अंत्ययात्रा विनायक नगर येथील राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुन, जावई, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे. लीलाधरराव खडसे यांना वणी बहुगुणीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
Comments are closed.