मारेगाव पंचायत समितीच्या आवारातच कोसळली वीज

सुदैवाने कार्यालयाला सुटी असल्याने अनर्थ टळला

भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या 4 दिवसांपासून मारेगाव शहरासहित तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच आज दुपारी पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसासोबतच विजेच्या कडकडाटालाही सुरुवात होऊन येथील पंचायत समितीच्या आवारात असलेल्या निंबाच्या झाडावर वीज कोसळली. सुदैवाने ‘सॅटरडे’ असल्याने अनर्थ टळला.

आज दुपारी शहरात मुसळधार पाऊस सुरु असताना विजेचा जोरदार कडकडाट झाला आणि पंचायत समितीच्या आवारात असलेल्या डेरेदार निंबाच्या झाडावर कोसळली. त्यामुळे निंबाचा काही भाग जळालेला आहे. पंचायत समिती हे नागरिकांच्या आवागमनाचे नेहमीचे ठिकाण आहे. येथे नेहमीच नागरिकांची मोठया प्रमाणावर वरदळ पहायला मिळते. विसावा म्हणून अनेक लोक याच वृक्षाखाली बसतात.

सुदैवाने आज शनिवार असल्याने कार्यालयाला सुट्टी होती. परिणामी कार्यालयात जनतेचा राबता नव्हता. त्यामुळे कोणताही अनर्थ घडला नाही. परंतु हिरव्या झाडावर पडलेल्या या विजेने झाड सुकून तर जाईल नाही ना अशी भीती निर्माण झाली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.