विज कोसळून एका बोकडासह 5 शेळ्या जागीच ठार

वरुड शिवारातील घटना, पशुपालकांचे मोठे नुकसान

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील वरूड येथे रविवारी दिनांक 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान वरुड शिवारात शेळ्या चरत असताना अकस्मात विज कोसळली. यात एका बोकडासह पाच शेळ्या जागीच ठार झाल्या.

तालुक्यात सकाळपासूनच उन सावलीचा खेळ सुरु होता. दुपार नंतर वातावरणात बदल होवुन ढगांची गर्दी व्हायला लागली. आणि साडे चार पाच वाजेदरम्यान अचानकच विजांच्या कडकडाटासह पावसाला तालुक्यात सुरवात झाली. दरम्यान गौराळा जवळील वरुड शिवारात माधो घोसरे 22 शेळ्यांचा कळप चारत होते.

काही शेळ्या समोर होत्या व आठ शेळ्या मागे असताना अचानक विजेचा कडकडाटासह वीज कोसळून एका बोकडासह पाच शेळ्या जागीच ठार झाल्या. यात बिजाराम नागोसे यांच्या तीन तर माधो घोसरे (शेळकी) यांच्या एका बोकडासह दोन शेळ्या होत्या. 

विज कोसळून ठार झालेल्या शेळ्यांची किंमत 70, 80 हजार रुपये असल्याचे सांगितले जात असुन नुकसान झालेल्या पशुपालकांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी नागरिकांमधुन मागणी होत आहे.

Comments are closed.