राम मुडे यांना पीएचडी

नागपूर विद्यापीठाने स्वीकारला शोधप्रबंध

विवेक तोटेवार, वणी: वणीतील राम मुडे यांना नागपूर विद्यापीठाची आचार्य ही पदमी प्राप्त झाली आहे. “आचार्य दादा धर्माधिकारी यांच्या जीवन आणि कार्याचे ऐतिहासिक अध्ययन (1899 – 1985)” या विषयावर त्यांनी संशोधन केले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे सप्टेंबर 2019 ला त्यांनी आपला शोधप्रबंध सादर केला होता. 25 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ द्वारा अधिकृत पणे इतिहास विषया अंतर्गत सदर शोधप्रबंधाकरिता आचार्य पदवी (पीएच. डी.) प्रदान करण्यात आली आहे.

सदर संशोधन त्यांनी प्रा. डॉ. गोविंद मा. तिरमनवार, (इतिहास विभाग) स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालय, नांदगाव पेठ ता.जि.अमरावती यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केले. राम मुडे यांनी रा.तु.म.नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर इतिहास विभागाच्या विभाग प्रमुख प्रो. डॉ. संगिता मेश्राम, प्रो.डॉ. शुभा जोहरी (माजी विभाग प्रमुख), प्रो.डॉ. शाम कोरेटी, न्यायमूर्ती स्व.चंद्रशेखर धर्माधिकारी, इतिहासचार्य स्व. डॉ. भा.रा.अंधारे, समाजसेविका लीलाताई चितळे यांचे आभार मानले. वडील स्व. नारायण ल. मुडे व आई इंदुबाई नारायण मुडे, जेष्ठ बंधू प्रा. डॉ. श्याम ना. मुडे व पत्नी एकता राम मुडे यांना त्यांनी आपल्या यशाचे श्रेय दिले.

Comments are closed.