सेवानिवृत्त कर्मचारी लिलाधर पालकर यांचे निधन

व्यावसायिक रवींद्र पालकर यांना पीतृशोक

बहुगुणी डेस्क, वणी : सेवानिवृत्त महसूल कर्मचारी लिलाधरराव रघुनाथजी पालकर यांचे आज मंगळवार, दिनांक 7 जानेवारी रोजी दुपारी 1.15 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 84 वर्षे होते.

लिलाधरराव पालकर हे अत्यंत सुस्वभावी, मनमिळाऊ आणि सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून शहरात परिचित होते. महसूल विभागातील प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी सेवानिवृत्ती घेतली होती. त्यांच्या अचानक जाण्याने पालकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरात शोककळा पसरली आहे.

शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तसेच पालकर बूट हाऊस आणि पालकर फटाका एजन्सीचे संचालक रवींद्र पालकर यांचे ते वडील आहे. त्यांच्या पश्चात मुलगा रवींद्र पालकर, कुटुंबीय व आप्तस्वकीय असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून अनेक मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 6.30 वाजता पोलिस स्टेशन मागील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे. तर मोधधाम येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

Comments are closed.