भरधाव ट्रकची ऑटोला जोरदार धडक, ऑटोचा चेंदामेंदा

7 प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर, ऑटोत महिला व शाळेचे विद्यार्थी

बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील वांजरी गावाजवळ मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. वणी येथून प्रवासी घेऊन नांदेपेरा दिशेने निघालेल्या तीनचाकी प्रवासी ऑटोला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने ऑटो अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात ऑटोतील 7 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.

ही दुर्घटना मंगळवारी सायंकाळी 6.15 वाजताच्या सुमारास वणी-नांदेपेरा मार्गावरील वांजरी गावाजवळ घडली. अपघातानंतर जखमींना तातडीने विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. काहींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर व नागपूर येथे रेफर करण्यात आले असल्याने त्यांची नावे अद्याप स्पष्ट होऊ शकली नाहीत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मजरा गावातील काही महिला तसेच शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी ऑटोने वणी येथून आपल्या गावाकडे जात होते. दरम्यान, वांजरी गावाजवळ समोरून आलेल्या ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. अपघातानंतर गावकऱ्यांनी तत्काळ मदतीचा हात पुढे करत जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले, तर उर्वरित जखमींवर शहरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी अपघातात सामील ट्रक ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (ईमेज एआय जनरेटेड)

 

Comments are closed.