शेतकऱ्यांच्या कष्टावर चोरट्यांचा डोळा ! शेतीचे साहित्य लंपास

पळसोनी शिवारातील घटना, शेतक-यांचे नुकसान...

बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील पळसोनि शिवारात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात शेतातील शेड फोडून तब्बल 30 हजार रुपयांचे शेती साहित्य लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस तपास सुरू आहे. 

तक्रारीनुसार, केशव श्रावण दुधबळे (वय 50, रा. पळसोनी, ता. वणी, जि. यवतमाळ) हे दिनेश आनंदराव मालेकार यांच्या मालकीचे 25 एकर शेत मागील तीन वर्षांपासून मक्तेदारीने करीत आहेत. शेतातील टिनाच्या सायवाना मध्ये त्यांनी शेती उपयोगी साहित्य ठेवले होते.

दिनांक 02 जानेवारी रोजी सायंकाळी 06 वाजता त्यांनी स्प्रे पंप (किंमत अंदाजे 3,000 रुपये), झटका मशीन (किंमत अंदाजे 10,000 रुपये), बॅटरी (किंमत अंदाजे 12,000 रुपये) व इतर साहित्य (किंमत अंदाजे 5,000 रुपये) असे एकूण 30,000 रुपयांचे साहित्य सायवाना मध्ये ठेवून घरी गेले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मात्र दुसऱ्या दिवशी 03 जानेवारी रोजी सकाळी 07 वाजता शेतात गेल्यावर सायवाना मधील सर्व साहित्य चोरीस गेलेले दिसले. आजूबाजूला शोध घेतला तरी साहित्य मिळाले नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्याने रात्रीच्या दरम्यान साहित्य चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.  प्रकरणी दुधबळे यांनी वणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बीएनएस कलम 303 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Comments are closed.