बहुगुणी डेस्क, वणी: लायन्स क्लब वणी आणि वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल, देशमुखवाडी येथे नुकतेच भव्य निःशुल्क मुख कर्करोग निदान शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास 70 हून अधिक रुग्णांनी तपासणी करून घेतली. नागपूरचे सुप्रसिद्ध ओरल कैंसर तज्ञ डॉ. चंद्रशेखर बांडे, चंद्रपूरचे प्रसिद्ध ओरल सर्जन डॉ. विजय उराडे, तसेच लायन डॉ. विजय राठोड, डॉ. रेशम शुगवानी आणि डॉ. रिषभ राठोड यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले.
शिबिरात मुख कर्करोगाच्या तपासण्या करण्यात आल्या, तसेच चित्रफितींद्वारे कर्करोग प्रतिबंध, लवकर निदान आणि उपचाराबाबत जागरूकता पसरवण्यात आली. रुग्णांना मोफत औषधे वितरित करण्यात आली. लायन्स क्लब वणीचे अध्यक्ष लायन तुषार नगरवाला यांनी सांगितले, “कर्करोगासारख्या गंभीर आजाराबाबत जनजागृती आणि लवकर निदानासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. यापूर्वीही अशा शिबिरांत शेकडो महिलांनी लाभ घेतला असून, ग्रामीण भागातील महिलांना तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळत आहे.”
शिबिराचे उद्घाटन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले, तर अध्यक्षस्थानी तुषार नगरवाला होते. मान्यवरांमध्ये लायन राजाभाऊ पाथ्रडकर, बलदेव खुंगर, सुधीर दामले, महेंद्र श्रीवास्तव, चंद्रकांत जोबनपुत्रा, रमेश बोहरा, पुरुषोत्तम खोब्रागडे, प्रा. अभिजीत अणे, मंजिरी दामले, वीणा खोब्रागडे, नंदलाल शुगवाणी, भिकामचंद गोयंनका आणि सचिन नरवडे यांचा समावेश होता. तज्ञ डॉक्टरांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनात लायन्स क्लब वणीच्या सदस्यांसह शाळेच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रा. अभिजीत अणे यांनी संचालन केले, तर महेंद्र श्रीवास्तव यांनी उपस्थितांचे आभार मानले. लायन्स क्लबने भविष्यातही अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला.





Comments are closed.