लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांना बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड

वणी लायन्स क्लबला तीन पुरस्कार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांना लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टच्या ‘मानवता सन्मान’ कार्यक्रमात, नागपूर येथे ‘बेस्ट प्रेसिडेंट’ अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम 2025 मध्ये आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, पाथ्रडकर यांना मागील वर्षीही रीजन आणि डिस्ट्रिक्ट स्तरावर ‘बेस्ट प्रेसिडेंट’ अवॉर्ड मिळाला होता.यासह, वणी लायन्स क्लबला प्लॅटिनम GMT अवॉर्ड, बेस्ट क्लब डिस्ट्रिक्ट अवॉर्ड आणि GMT अचिव्हमेंट्स प्लॅटिनम अवॉर्ड अशा तीन प्रतिष्ठित पुरस्कारांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. रीपल राणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या यशाबद्दल माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, बलदेव खुंगर, किशन चौधरी, नरेंद्र बरडीया, रमेश बोहरा, सुधीर दामले, तुषार नगरवाला, चंद्रकांत जोबनपुत्रा, शमीम अहमद, महेंद्र श्रीवास्तव, डॉ. के. आर. लाल, दत्तात्रय चकोर, प्रमोद देशमुख, एस. बी. पांडे, पुरुषोत्तम खोब्रागडे, प्रशांत गोडे, चित्रा देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांचे अभिनंदन केले.

Comments are closed.