लायन्स क्लब वणीचा पदग्रहण सोहळा संपन्न

तुषार नगरवाला यांनी घेतली अध्यक्षपदाची सूत्र हाती

पुरुषोत्तम नवघरे, वणीलायन्स क्लब वणीचा पदग्रहण सोहळा शनिवारी दि. 26 जुलै 2025 रोजी लायन्स स्कूल सभागृहात संपन्न झाला. माजी प्रांतपाल सुनील वोरा, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, झोन चेअरपर्सन मनिषा पटेल, राजाभाऊ पाथ्रडकर आणि किशन चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. तुषार नगरवाला यांची 2025-26 साठी अध्यक्षपदी निवड झाली होती. तुषार नगरवाला यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.

बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये राजाभाऊ पाथ्रडकर, महेंद्र श्रीवास्तव, डॉ. विजय राठोड, प्रा. डॉ. अभिजित अणे, डॉ. हिमांशू लाल, शमीम अहमद, प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, रमेश बोहरा, संजीव चींतलवार, विणा खोब्रागडे, मंजीरी दामले आणि यश श्रीवास्तव यांचा समावेश आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दीपप्रज्वलन आणि क्लब प्रार्थनेने कार्यक्रम सुरू झाला. स्व. नरेंद्र नगरवाला यांचा समाजसेवेचा वारसा त्यांचे पुत्र तुषार चालवत आहे. असे मनोगत लायन सुनील वोरा यांनी व्यक्त केले. तसेच माजी आमदार लायन संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी तुषार नगरवाला व सहकारी कौतुकास्पद कामगिरी करतील अशी आशा व्यक्त करून त्यांनी संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर झोन चेअरपर्सन मनिषा पटेल यांनीही  मनोगत व्यक्त केले.

सोनाली काळे आणि पौर्णिमा खिरटकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. अभिजित अणे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सांगता झाली. कार्यक्रमाला शांतीलाल पांडे, प्रमोद देशमुख, डॉ. के. आर. लाल, बलदेव खुंगर, सुधीर दामले, ज्योती नगरवाला, खुशी नगरवाला, पुरुषोत्तम खोब्रागडे, छाया श्रीवास्तव, हर्ष खुंगर, नंदलाल शुगवानी, भिकमचंद गोयनका, प्रशांत गोडे, चित्रा देशपांडे यांच्यासह पदाधिकारी, मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते.

Comments are closed.