अडेगाव येथील अवैध दारू अड्ड्यावर धाड

आमदारांच्या दत्तक गावातच अवैध धंद्यांना ऊत

0

सुशील ओझा, झरी: आमदार दत्तक ग्राम अडेगाव येथे अवैध दारू विक्रीसह जुगार तेजीत सुरू आहे. पोलिसांनी येथील दारू अड्ड्यावर धाड टाकून पाच हजारांची दारू जप्त केली.

Podar School 2025

अडेगाव येथील अवैध दारू विक्री पोलिसांनी बंद केली होती. परंतु दारू विक्रेते तरुणांना हाताशी धरून देशी दारूचे पवे नेऊन १०० रुपयेप्रमाणे विक्री करीत आहे. अडेगाव आमदार यांचे दत्तक गाव असून, या गावातच मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

बसस्टँड, झुणका भाकर केंद्र, पाणीच्या टाकीजवळ, तलावाकडे तर काही पानटपरी, चिकन सेंटरवर दारू विक्री व वरलीमटका सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार व नागरगोजे यांनी सापळा रचून विनोद मासिरकर याच्या घरुन ९० देशी दारूचे पव्वे जप्त केले. .

दारू विक्रेत्याच्या घरी दारू पोहोचवणाऱ्या नीलेश पारशिवे यांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.