पोलिसांनी आवळला दारू तस्करांवर फास, आज तीन ठिकाणी कारवाई

नांदेपेरा-वनोजादेवी रोड ठरतोय दारू तस्करीचा शॉर्टकट....

0

विवेक तोटेवार, वणी: आजचा दिवस दारू तस्करी रोखण्याचा ठरला. आज पोलिसांनी 3 ठिकाणी कारवाई करत एकून 6 जणांना अटक केली. या कारवाईत एकून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे यात अटक कऱण्यात आलेले सर्व आरोपी हे वरो-याचे असून ते वणीतून दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारू नेताना सापडले आहेत. ही सर्व कारवाई एसडीपीओ पथकाने केले असून या सर्व कारवाई वनोजादेवी नांदेपेरा रोडवर करण्यात आल्या हे विशेष. त्यामुळे या मार्गाचा वापर आता चंद्रपूर जिल्ह्यात तस्करी करण्यासाठी केला जात असल्याचे दिसून येत आहे.

Podar School 2025

वनोजादेवी मार्गाने वरोरा येथे दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती एसडीपीओ पथकाला मिळाली. या माहितीवरून वणी-मारेगाव पोलिसांनी वनोजादेवी पॉइंटवर सापळा रचला. दरम्यान तिथे हिरो होंडा शाईन (MH 34 BP 1432) या दुचाकीवर तीन इसम आले. त्यांना थांबवून त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याजवळील बॅग मध्ये ऑफिसर चॉईस या विदेशी दारूच्या 180 मिलीच्या 35 बॉटल, 375 मिली च्या 9 बॉटल सापडल्या. पोलिसांनी दुचाकी व दारू असा एकूण 50,700 चा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत आरोपी राहुल प्रभाकर भालेराव (25), साहिल संजय मूळे (18) वृषभ रमेश रठ्ठे (20) या तिघांना अटक केली. हे सर्व राहणार वरोरा येथील रहिवाशी होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यानंतर याच पॉइंटवर स्कुटी (MH 34 AZ 1540) ने दोन इसम येताना दिसले. त्यांची झडती घेतली असता बॅगमध्ये विदेशी दारूच्या 180 मिलीच्या 95 बॉटल, तसेच देशी दारुच्या 180 मिलीच्या 45 बॉटल सापडल्या. पोलिसांनी एकून 51,175 चा मुद्देमाल जप्त केला. यात आरोपी अनिल सिंग अदफ सिंग जुनी (25) गणेश दामोदर जामनी (45) यांना अटक केली आहे.

तर तिसरी कारवाई ही वांजरी-नांदेपेरा रोडवर करण्यात आली. यात आरोपी सतीश रामकृष्णा पाचभाई (36) हा एविएटर ही मोपेड घेऊन जात असताना पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याकडून 10080 ची दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत एकून दार व मोपेड असा 50080 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या सर्व कारवाईत आरोपींवर कलम 65 (फ) (ड) सहकलम 188, 269, भादंवि सहकलम 51 (ब), आपत्ती व्यवस्थापन 2005, सहकलम कोव्हीड 19 अधिनियम 2019 नियम 11 सहकलम 188 मोदाका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांचे मार्गदर्शनात ठाणेदार जगदीश मंडलवार, शेख इकबाल, आशिष टेकाडे, विजय वानखेडे, अतुल पायघन, अशोक दरेकर, नितीन खांदवे, अनिल गिणगुले यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.