वणी तालुक्यातील भारनीयमन तत्काळ बंद करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

0

बहुगुणी डेस्क, वणी : तालुक्यातील भारनियमन सरसकट त्वरित बंद करण्यात यावे य़ा मागणीसाठी संभाजी ब्रिगेड वणी तालुक्याच्या वतीने म रा वि वि कार्यालयामध्ये शाखा प्रबंधक यांना निवेदन दिले.
या निवेदनामध्ये वणी तालुक्यतील सरसकट त्वरित भारनियमन मुक्त करण्यात यावे कारण सध्या परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या पिकाला पाणी देण्याचे काम सुरू आहे. परंतु दिवसभर लाईट नसल्यामुळे रात्री पाणी देणे शक्य नाही. तसेच वन्य प्राण्यांचा धोका बघता ते जीवघेणे ठरू शकते. शालेय विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्रांत परीक्षा सुध्दा सुरू आहेत. अशा परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना भारनियमनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी संभाजी ब्रिगेड वणी तालुका शाखेकडे आल्यात.

संभाजी ब्रिगेडच्या विनंती ला मान देऊन भारनियमन तत्काळ बंद करावे .अन्यथा संभाजी ब्रिगेड तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल व त्यानंतर होणाऱ्या नुकसानीला माहावितरण कार्यालय जबाबदार राहील. असे निवेदन संभाजी ब्रिगेड वणीच्या वतीने देण्यात आले. य़ा वेळी जिल्हा अध्यक्ष अजय धोबे, तालुका अध्यक्ष विवेक ठाकरे, अभय पानघाटे, दत्ता डोहे, संदीप रिंगोले, शंकर पुनवटकर, भोजू, राजू बोकडे, चंद्रभान बान्दुरकर, गजानन बण्दूरकर, देवदास बान्दुरकर, नुकुल थेटे, अमित गाताडे व शेकडो संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते व ग्रामीण भागातील शेतकरी हजर होते .

Leave A Reply

Your email address will not be published.