कोंडावार ले आऊट येथील दारू दुकानास स्थानिकांचा विरोध

उपविभागीय अधिका-यांना दिले महिलांनी निवेदन

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील कोंडावार ले आऊटमध्ये एक दारू दुकान व बार सुरू असल्याची माहिती आहे. सदर परिसर हा दलित वस्तीचा परिसर असून येथे कोणतेही दारू दुकान सुरू होऊ नये. याकरिता येथे राहणाऱ्या महिलांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

कोंडावार ले आऊट हा दाट व दलित वस्तीचा परिसर आहे. या ठिकाणी देशी दारू दुकान सुरू होत असल्याची माहिती येथील नागरिकांना मिळाली आहे. या ठिकाणी दारू दुकान सुरू करण्यासाठी मालकाने कुणाचेही नाहरकत घेतलेले नाही. यात राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे. असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

या दारू दुकानाला व बारला मान्यता देऊ नये अशा आषयाचे निवेदन मंगळवार 9 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. दारू दुकान सुरू झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा येथील महिला सुरभी नरेश पाते यांनी दिला आहे.

हे देखील वाचा:

मारेगाव येथे कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन

नागपूरमध्ये करा लक्झरी फ्लॅट खरेदी

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.