विवेक तोटेवार, वणी: शहराच्या मुख्य बाजारपेठेत व्यापारी वर्ग व ग्राहकांसाठी प्रसाधन गृह (मुतारी) होते. हे प्रसाधनगृह गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होते. परंतु नगर पारिषदेने दुर्गंधीचे कारण देत या प्रसाधनगृहाला कुलूप ठोकले. याचा बाजारपेठेतील व्यापा-यांनी याचा विरोध केला होता. हे प्रसाधनगृह पूर्ववत सुरू करण्याची मागणी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे केली होती. अखेर युवासेनेच्या मागणीला यश आले आहे.
वणीच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या (गांधी चौकात) मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेले पुरुष प्रसाधनगृह गेल्या महिनाभरापासून नगर परिषदेकडून बंद करण्यात आले होते. नगर परिषदेकडून या प्रसाधनगृहासमोर कुलूप लावून नगर परिषद आरोग्य विभागाच्या मागे असलेली मुतारी वापरण्यात यावी असा बोर्ड लावण्यात आला होता.
हे मुत्रीघर बंद करण्याच्या नगर परिषदेकडून मुत्रीघराची दुर्गंधी येत असल्याचे कारण देण्यात आले होते. याचा अनेकांनी विरोध केला होता. ही बाब अनेक व्यावसायिकांनी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत अजिंक्य शेंडे यांनी 1 फेब्रुवारी रोजी मुख्याधिकारी यांना मुत्रीघर उघडण्याबाबत निवेदन दिले होते. त्यांच्या निवेदनाची दखल घेत मुख्याधिकारी यांनी प्रसाधनगृहाचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले होते.
Comments are closed.