उद्या वणीत लोकअदालतीचे आयोजन

लोकअदालतीत प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्याचे आवाहन

विवेक तोटेवार, वणी: राष्ट्रीय विधी संघ प्राधिकरण दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशवरून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ तर्फे शनिवार 7 मे रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हातील सर्व न्यायालयामध्ये लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीमध्ये न्यायालयात दाखल असलेली प्रकरणाचा तडजोडीतून निपटारा करता येतो. त्यामुळे या लोकअदालतीचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर लोकअदालतीमध्ये कामगार वाद प्रकरणे, चेक बॉउंस प्रकरणे, बँक वसूल प्रकरणे, फौजदारी ताडजोडपात्र प्रकरणे, वैवाहिक वादाबाबतची प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, इत्यादी अशा प्रकारची प्रकरणे ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा. तसेच दाखलपात्र प्रकरणाबाबत नजदिकाच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय, यवतमाळ तसेच तालुका विधी सेवा समिती, तालुका न्यायालय यांच्याकडे अर्ज करावा.

आयोजित केलेल्या या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आपली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटविण्याचे आव्हाहन विधी प्राधिकारणाद्वारे करण्यात आले आहे. अधिकाधिक लोकांनी या लोकअदालतीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

True Care

हे देखील वाचा:

सुपरहिरो डॉ. स्ट्रेंज आलाये भेटीला… नवीन सिनेमा रिलीज…

वणीत प्रोफेशनल मेकअप व हेअर स्टायलिंग वर्कशॉप

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!