एलटी कॉलेजचा ऑनलाईन पद्धतीने अभ्यास सराव

वनस्पतीशास्त्र विभागाचा अनोखा उपक्रम

0

वणी बहुगुणी डेस्क: वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र  विभागातर्फे  बी.एस्सी. प्रथम व अंतीम वर्षांची ऑनलाईन सराव परीक्षा सुरू केली आहे. यात आतापर्यंत महाविद्यालयातील सुमारे 100 व इतर महाविद्यालयातील सुमारे 200 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या सराव परीक्षेत बी.एस्सी प्रथम व अंतिम वर्षांच्या कोणत्याही विद्यार्थ्याला सहभागी होता येते.

कोरोना महामारीमुळे देशंभरात लॉकडाउन सुरु आहे. शाळा कॉलेज बंद असल्यामुळे त्याची झळ विद्यार्थ्यांनाही बसत आहे. वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा साधारणतः एप्रिल आणि मे महिन्यात असतात. परंतु लॉकडाउन मुळे त्यापुढे ढकलल्या गेल्या आहे. विदयार्थ्यांनी घरी राहून त्यांचा अभ्यास जवळपास पूर्ण केला आहे आणि ते आता परीक्षेची वाट पाहत आहे.

याची दखल घेत वनस्पतीशास्त्र विभाग, लोकमान्य टिळक महाविद्यालय यांनी गुगल फॉर्म चा वापर करून बी.एस्सी. प्रथम व अंतीम वर्षांच्या वनस्पतीशास्त्र या विषयासाठी ऑनलाईन वस्तुनिष्ठ प्रश्नावली तयार केली. ती सगळ्या विद्यार्थ्याना मोबाइलला द्वारे पाठवली जाते. ज्याद्वारे विद्यार्थी ती प्रश्नावली ऑनलाईन पद्धतीने सोडवून त्यांनी केलेल्या अभ्यासाचा सराव करीत आहे. तसेच कॉलेजच्या प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ऑनलाईन स्टडी मटेरिअलही पुरवले जात आहे.

विद्यापीठाच्या परीक्षेच्या वेळी फायदा होणाार – प्रा. राजूरकर

विद्यार्थ्यांचा अभ्यास आधीच झाला आहे. जर विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू राहिला नाही तर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास तर सुरू आहे. शिवाय जेव्हा केव्हा त्यांच्या विद्यापीठाद्वारे परीक्षा घेण्यात येईल तेव्हाही त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होणार. सध्या बी.एस्सी द्वितीय वर्षाच्या प्रश्नावलीचे  काम सुरू असून लवकरच त्याची प्रश्नावलीही जाहीर करण्यात येईल. – प्रा. डॉ. अजय राजूरकर, सहयोगी प्राध्यापक

लोकमान्य टिळक महाविद्यालयासोबतच इतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचाही या अनोख्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. रवींद्र मते यांच्या मार्गदर्शनात सहयोगी प्रा. डॉ. अजय राजूरकर व ग्रंथालय प्रमुख डॉ. गुलशन कुथे यांनी हि ऑनलाईन पद्धतीने प्रश्नावली तयार करण्यासाठी योगदान दिले. या सराव परीक्षेच्या उपक्रमाचा जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी केले आहे.

B. Sc. III, Sem-VI सराव परिक्षेची लिंक…

Unit I Test 1: https://forms.gle/c4mNQ7JJen2oudJVA

Unit I Test 2: https://forms.gle/D5HLzGkkpdsY8SSU7

Unit I Test 3: https://forms.gle/SRYnvHVSuNsmWtNa9

Unit II Test 1: https://forms.gle/qyo8QfiTteaaTTkQA

Unit II Test 2: https://forms.gle/my7rAXmbyqd8bCrLA

B. Sc. I, Sem-VI सराव परिक्षेची लिंक…

Unit- I (Palaeobotany) इथे क्लिक करा:- https://forms.gle/SPcUjVXLpMGLqsWK7

Unit- II (Gymnosperm)इथे क्लिक करा:- https://forms.gle/AWtDbtm3xg4fLij77

Unit- III (Morphology) इथे क्लिक करा:- https://forms.gle/BxYRiCwgGWFhDXJd9

Unit- IV (Morphology) इथे क्लिक करा:- https://forms.gle/f77C1V3zkEo7rMLu9

Unit-V (Morphology and Utilization of Plants) इथे क्लिक करा:- https://forms.gle/kqkReSBB8vY5Zrf88

अधिक माहितीसाठी संपर्क-

1. Dr. R. S.Matte
[email protected] or 9823491707
2. Dr. Ajay V. Rajurkar
[email protected] or 8669130089

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.