मॅकरून स्टूडेन्ट्स अकॅडमीच्या नवीन शाखा प्रवेश कार्यालयाचे मंगळवारी उद्घाटन

गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसरात होणार प्री प्रायमरीचे क्लास... अधिक माहिती व प्रवेशासाठी संपर्क: 9923522400, 8554036501

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सुप्रसिद्ध मॅकरून स्टूडेंट्स अकॅडमीच्या नवीन शाखेचे व प्रवेश कार्यालयाचे गंगशेट्टीवर मंगल कार्यालय परिसरात मंगळवारी दिनांक 7 जून रोजी दुपारी 1 वाजता उद्घाटन होणार आहे. MSPM गृपचे संचालक पीएस आंबटकर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार असून त्यांच्याच हस्ते नवीन शाखा व प्रवेश कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.  गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसरात सुरू होणा-या नवीन शाखेत प्री प्रायमरीचे म्हणजेच नर्सरी, KG-I, KG-II यासह इयत्ता 1 व 2 चे क्लास होणार आहेत. तरी पालकांनी लवकरात लवकर या नवीन ठिकाणी संपर्क साधून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शाळा व्यवस्थापनाद्वारे करण्यात आले आहे.

सध्या मॅकरून स्टूडेंट अकाडमीचे क्लास 1 पासूनचे वर्ग वडगाव रोड येथील प्रशस्त बिल्डिंगमध्ये घेतले जातात. लहान मुलांना शहरातच शिक्षण मिळावे यासाठी मॅकरूनतर्फे आता शहराच्या मध्यभागी असलेल्या गंगशेट्टीवार मंगल कार्यलय परिसरातील प्रशस्त जागेत प्री प्रायमरीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. शिवाय मॅकरून स्टूडेन्ट्स अकाडमीत प्रवेश घेण्यासाठी या ठिकाणी प्रवेश कार्यालय देखील सुरू होणार आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात MSPM गृपचे संचालक पीएस आंबटकर यांच्यासह उपसंचालक पियूष आंबटकर, मॅनेजिंग डायरेक्टर अंकिता आंबटकर, मुख्याध्यापिक शोभना यांच्यासह शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहणार आहे.

नवीन ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त क्लासरूम, मुलांना खेळण्याची मुबलक जागा, स्विमिंग टॅंक, झुले इत्यादींची व्यवस्था असून शिकवण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी स्कूलबसची सुविधा देखील उपलब्ध आहे.

मॅकरून स्टूडेन्ट्स अकाडमी ही शहरातील एक सुपरिचीत शाळा असून या अकॅडमीची मुख्य शाखाही वडगाव रोड येथे आहे. उत्कृष्ट निकालासाठी या शाळेची ओळख आहे. अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या खेळ, फाईन आर्ट, संगीत इत्यादी गोष्टींना प्रेरणा मिळण्यासाठी इथे त्या विषयातील शिक्षकांची देखील नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे. त्यामुळे अभ्यासासोबतच इथे पाल्यांच्या सर्वांगिन विकास होतो. त्यामुळे पाल्यांनी लवकरात लवकर आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शाळा व्यवस्थापनाद्वारे कऱण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी संपर्क:
9923522400, 8554036501, 7410756433,  9921888588
पत्ता: मॅकरून स्टूडेन्ट्स अकाडमी, गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसर, वरोरा रोड, वणी
मुख्य शाखा: मॅकरून स्टूडेन्ट्स अकाडमी, वडगाव रोड, वणी

Comments are closed.