महादेव नगरीतील धाडीत 8 लाखांचा मु्द्देमाल जप्त

प्रतिबंधीत तंबाखू, गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी इत्यादी माल जप्त, अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल...

विवेक तोटेवार, वणी: महादेव नगरी येथे प्रतिबंधित तंबाखू धाड प्रकरणी आता अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादीनुसार सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडीत एकूण 8 लाख 2 हजार 304 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

रविवारी दिनांक 25 डिसेंबर रोजी रात्री पोउनि प्रवीण हिरे व पोहेकॉ वसीम शेख हे 25 डिसेंबर रोजी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खब-यांकडून महादेव नगरी येथील पाण्याच्या टाकीजवळ एक वेगन आर कार (MH31 BC4775) संशयास्पदरित्या उभी असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथक रात्री 12 वाजताच्या सुमारास महादेव नगरीत पोहोचले असता तिथे त्यांना सदर कार आढळून आली. त्यांनी गाडीची झडती घेतली असताएक अज्ञात वाहन महादेव नगरी चिखलगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ उभे आहे.

सदर कारमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधीत तंबाखू, गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी इत्यादी आढळून आला. हिरे यांनी वाहन पोलीस ठाण्यात आणून ठेवले व अन्न सुरक्षा अधिकारी यांना याबाबत माहिती दिली. तपासणी दरम्यान सॅट्रो वाहनाच्या मागच्या सीट काढून यामध्ये हा तंबाखू ठेवण्यात आला होता. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये शिशा हुक्का तंबाखू 8 बॉक्स, ईगल सुगंधीत तंबाखू 6 बॅग, राजश्री पान मसाला 2 बॅग, विमल पान मसाला 6 बॅग, सुगंधीत सुपारी 8 बॅग, ब्लॅक लेबल तंबाखू 1 बॅग असा एकूण4 लाख 52 हजार 301 तंबाखूचा माल तसेच कार किंमत 3 लाख 50 हजार रुपये असा एकूण 8 लाख 2 हजार 301 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वणीकरांना कर्करोगाचा विंचू चावला…
तंबाखूजन्य व सुपारीच्या मालाच्या पॉकेटवर कर्करोगाचा विंचू याचे चित्र असते. हा कर्करोगाचा विंचू परिसरातील सर्वसामान्यांना चांगलाच चावला आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून या क्षेत्रात चांगलेच ‘दीपक’ लावले आहेत. या प्रकरणी मालाचा मालक कोण?, पुरवठादार कोण?, कुणाकुणाला हा माल विक्री केला आहे? कुठे कुठे या मालाचा साठा करून ठेवला आहे?, याचा साथीदार कोण आहे? या सर्व प्रश्नाचा उलगडा होणे अजून बाकी आहे. पोलीस तपासात ते लवकरच माहीत होणार आहे.

हे देखील वाचा: 

न्यू रसोई (प्युर वेज) रेस्टॉरन्ट ग्राहकांच्या सेवेत

चोरट्यांनी उडवली महिलेच्या खांद्यावरची पर्स, मोबाईल व रोख रक्कम लंपास

खडकी फाट्याजवळ ऑटो पलटी, 12 मजूर जखमी

Comments are closed.