केंद्र सरकार विरोधात तालुका व युवक काँग्रेसचे आंदोलन
पेट्रोल, डिजल व सिलेंडर दरवाढ विरोधात निवेदन
सुशील ओझा, झरी: गेल्या 7 वर्षांत केंद्रातील मोदी सरकारने महागाई वाढवून गोरगरिबांना देशोधडीला लावले आहे. तर पेट्रोल 100 रुपये लिटरच्यावर ते 100 रुपयांच्या जवळ डिजलचे भाव वाढल्याने सर्व साधारण माणसाचे जगणे कठीण केले आहे. असा आरोप करीत झरी तालुका व युवक काँग्रेसने मोदी सरकारचा विरोध करीत आंदोलन करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
सर्वसामान्य लोकांचा पगार कमी व खर्च जास्त अशी परिस्थिती महागाईमुळे जनतेची झाली आहे. दररोजच्या उपयोगातील सर्वच वस्तू महाग झाल्या आहे. गॅस सिलेंडर महाग झाल्याने जनतेचे कंबरडे मोडले आहे. घर व कुटुंब चालवायचे कसे अशा विवंचनेत जनता अडकली आहे.
तरी केंद्र सरकारने पेट्रोल ,डिजल, गॅस व जीवनव्याश्यक वस्तू वरील दर कमी करावे अशी मागणी तहसीलदार गिरीश जोशी यांना दिलेल्या निवेदनातून काँग्रेस तालुका अध्यक्ष आशीष खुलसंगे, मध्यवर्ती बँक संचालक राजू येल्टीवार, सभापती संदीप बुरेवार, माजी संचालक तथा सरपंच नीलेश येल्टीवार,
युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष राहुल दांडेकर, माजी प.स सभापती संगीता नाकले, भूमरेड्डी बाजनलावार, मिथुन सोयाम, हरदास गुर्जलवार, संतोष कोहळे, केशव नाकले,संजय कुरमचेट्टीवार, सुनील मोहजे, पुंडलिक तोडसाम, चेतन म्याकलवार, नितीन खडसे, संतोष नलावार, प्रतीक गंद्रतवार, गणेश कुडमेथे, आतेश मडावी, योगेश कुमरे,व पांडुरंग भुसेवार यांनी केली आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा