पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा मारेगावात निषेध
ज्योतिबा पोटे, मारेगाव: यवतमाळ जिल्हातील महागाव येथील सकाळ वृत्तपत्राचे प्रतिनिधी गणेश भोयर यांना मारहाण करण्यात आल्याच्या घटनेचा मारेगावात निषेध करण्यात आला. गणेश भोयर यांनी वृत्त संकलनासाठी वाहतूक कोंडीचे फोटो घेतले असता उपस्थित पथकातील महिला पोलीस जमादार छाया खंदारे व शिपाई मसुदा शेख आणि सहकारी यांनी फोटो का घेतले म्हणून पत्रकार गणेश भोयर यांचा मोबाईल फोडुन मारहाण केली होती.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारावर होणारा भ्याड हल्ला हा समाजासाठी निषेधार्थ असून या घटनेचा मारेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने मारेगाव येथील नायब तहसीलदार विवेक पांडे व मारेगाव पोलीस स्टेशनचे पो.नि.अमोल माळवे यांना निवेदन सादर करुन निषेध करण्यात आला. निवेदन देते वेळेस मारेगाव तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दीपक डोहणे, सचिव ज्योतिबा पोटे, देवेंद्र पोल्हे, अशोक कोरडे, नागेश रायपुरे, उमर शरिप, मोरेश्वर ठाकरे उपस्थित होते.