नागेश रायपुरे, मारेगाव : महाजनादेश यात्रेदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवनीस हे यवतमाळ जिल्ह्यात आले. तालुक्यातील कोसारा येथे जंगी त्यांचे स्वागत करण्यात आले. एक ऑगस्टपासून अवघ्या महाराष्ट्र राज्यात महाजनादेश यात्रा निघाी आहे. फटाक्यांची आतशबाजी करुन पारंपरिक डफरे, ढोल आणि ताशांनी त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, कॅबिनेट मंत्री प्रा.अशोक उईके, वणी विधान सभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, केळापूर आर्णी विधानसभचे आमदार राजू तोडसाम, वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा सरचिटणीस दिनकर पावड़े, जिल्हा उपाध्यक्ष विजय पिदुरकर, जिल्हा सचिव प्रा.डॉ. माणिक ठिकरे, मारेगाव तालुकाध्यक्ष शंकर लालसरे, तालुका सरचिटणीस रमण डोये, प्रशांत नांदे, द्नानेश्वर चिकटे, गणपत वाराटे आदी कार्यकर्ते आणि हजारो नागरिक या महाजनादेशयात्रेच्या स्वागता साठी उपस्थि होते. दरम्यान कोसाऱ्यावरून महाजनादेश यात्रा पुढे राळेेगाव, यवतमाळकड़े चोख पोलीस बंदोबस्तात रवाना झाली.