वणीत संजय देरकर यांची कार्यकर्त्यांसोबत सहविचार सभा

यावेळीही साथ देण्याचा कार्यकर्त्यांचा वादा

0

विवेक तोटेवार, वणी: वणीतील ताज सेलिब्रेशन येथे संजय देरकर समर्थकांची सहविचार सभा पार पडली. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, सरकारी संस्थांचे सभासद व पदाधिकारी तसेच सर्व समाजातील प्रतिनिधी यांच्यासह वणी व परिसरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेत संजय देरकर यांनी ही निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. उपस्थित कार्यकर्त्यांना संजय देरकर यांनी मार्गदर्शन केले.

सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून यात संजय देरकर यांचे नाव आघाडीवर आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा सर्कल नुसार जनसंपर्क दौरा सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून वणीत सहविचार सभा घेण्यात आली. उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संजय देरकर म्हणाले की.

आजपर्यंत तुम्ही मला वेळोवेळी सहकार्य केले. यापुढे ही सहकार्य करणार अशी अपेक्षा असल्याने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याआधी पक्षाची तिकीट असो किंवा अपक्ष असो आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला दर वेळी साथ दिली. यावेळी ही आपण साथ द्याल याची खात्री आहे. अशी अपेक्षा त्यांनी कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली.

यावर उपस्थित प्रतिनिधींनी आपले विचार मांडले. गेल्या 15 वर्षांपासून आम्ही संजयभाऊ देरकर यांच्या सोबत असून यापुढेही आम्ही सोबत असणार अशी ग्वाही त्यांनी संजय देरकर यांना यावेळी दिली. संजूभाऊ हेच आमचे नेते असून संजूभाऊ जो पक्ष म्हणणार तोच आमचा पक्ष असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष कुचनकर, शिंदोल्याचे सरपंच राजू इद्दे, भालर सोसायटीचे अध्यक्ष संजय देठे, माजी नगरसेवक गणेश सुंकुरवार, राष्ट्रवादीचा माजी शहर अध्यक्ष मनिष बत्रा यांच्या सह शेकडो  कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.