वणी येथे महाराष्ट्र छात्र सेना दिन साजरा
वणी (विलास ताजने):- वणी येथील शासकीय मैदानावर २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती महाराष्ट्र छात्र सेना दिन म्हणून साजरी करण्यात आली. यात विविध शाळांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रशांत गोडे होते. महाराष्ट्र छात्र सेना तालुका समादेशक जी.वी. मोहितकर, एम.सी.सी. प्रशिक्षकांची उपस्थिती होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पन करण्यात आले. प्रास्थाविक व संचालन एस. पी.एम.शाळेचे एम.सी.सी. प्रशिक्षक किरण बुजोने यांनी केले. यावेळी मंचावरील उपस्थितांनी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमानंतर बँड पथकाच्या गजरात शहरातून मिरवणूक काढण्यात आली. सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला हारार्पन करून घोषणा देण्यात आल्या. मिरवणूकीत एस.पी.एम. विद्यालय, आदर्श हायस्कूल, जनता हायस्कूल, विवेकानंद विद्यालय, शाहू महाराज विद्यालय, नुसाबाई चोपणे विद्यालय यांनी सहभाग घेतला होता.