शिवचरित्र म्हणजे जगण्याची समृद्ध गुरुकिल्ली-डॉ. विजय तनपुरे

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: सर्वांनी आपल्या आयुष्यात कसं जगावं हे शिवचरित्रातून शिकण्यासारखं आहे. शिवचरित्र म्हणजे जगण्याची समृद्ध गुरुकिल्लीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य रयतेसाठी स्वराज्य उभं केलं. सर्वसामान्य जनतेचा राजा म्हणून ते लोकहितासाठी लढलेत. लोकराजा म्हणून स्वतःचं अस्तित्त्व त्यांनी निर्माण केलं. असं प्रतिपादन शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांनी केलं. शिवसेना व वणी शहरप्रमुख राजू तुराणकर द्वारा आयोजित आदिशक्ती निर्मित ‘‘मी बी घडलो …. तुम्ही बी घडाना’’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात जि. प. शाळेच्या मैदानात हा कार्यक्रम झाला. देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाप्रमुख दीपक कोकास, उद्घाटक लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. करमसिंग राजपूत तर प्रमुख अतिथी म्हणून लोढा हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. प्रीती महेंद्रसिंगजी लोढा उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू तुराणकर यांनी तर संचालन व आभारप्रदर्शन सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले.

या कार्यक्रमााचे औचित्य साधून माजी सैनिक शंकरराव तिराणकर, सुरेशजी पदलमवार, नामदेवराव शेलवडे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तनपुरे यांनी विषयाला हात घालीत छत्रपती शिवरायांच्या नियोजन व दक्षतेवर प्रकाश टाकला. शाहिस्तेखानाचे लालमहालातील प्रकरण जरी तीन तासात झाले असले तरी त्यासाठी छत्रपतींनी तीन वर्षे त्याची पूर्वतयारी केली. फर्जंद शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊंनी त्यांना भाषा, शास्त्र, शस्त्र अशा अनेक विषयांच्या शिक्षणाची पूर्ण व्यवस्था केली होती. एवढे पराक्रमी आणि विश्ववंद्य छत्रपती आपल्या माता-पित्यांच्या आज्ञेत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिताना छत्रपतींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला. शेतक-यांची काळजी करणारा, कर्जमाफी करणारा, बी-बियाणे पुरविणारा असा कणवाळू राज म्हणूनही इतिहास साक्षिदार असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. करमसिंग राजपूत यांचे अभ्यासपूर्ण भाषण यावेळी झाले. प्रबोधनकार ठाकरेंपासून बाळासाहेबांपर्यंतचा इतिहास त्यांनी पुढे मांडला. शेतकÚयांसाठी ग्राउंडलेव्हलवर कार्य करणारा पक्ष म्हणून शिवसेनेचा त्यांची गौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक कोकास यांनी अध्यक्षीय भाषणात विविध विषयांवर उहापोह केला.

संजय निखाडे, गणपत लेडांगे, टीकाराम खाडे, वर्षा पोतराजे, बंटी ठाकूर, प्रमोद मिलमिले, ललित लांजेवार, अनिल राजूरकर, तेजराज बोढे, अभय सोमलकर, सचिन मत्ते, राजेंद्र देवडे, घनश्याम निखाडे, अजय चन्ने, सुभाष ताजणे, गजानन मेश्राम, अनिल उलमाले, महेश चौधरी, रवी बोढेकर, अजय पिंपळकर, बाळू तुराणकर, प्रशांत बलकी, अजिंक्य शेंडे, महेश पहापळे, संजय लोणारे, गणेश जुनगरी, प्रवीण ताजणे, मंगल भोंगळे, गीतेश वैद्य व शिवसैनिकांनी आयोजनाची व्यवस्था सांभाळली. वणीकरांची भरगच्च उपस्थिती हे कार्यक्रमाचे विशेष ठरले.

Leave A Reply

Your email address will not be published.