विद्यानिकेतन स्कूलमध्ये गांधी नि शास्त्रीजयंती साजरी
मान्यवरांनी उलडगडलेत महामानवांचे जीवनपट
नागेश रायपुरे, मारेगाव: येथील विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या कु.ज्योत्स्ना बोंडे यांनी गांधीजीच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच संस्थेचे सचिव राजेश पोटे यांनीसुद्धा लाल बहादूर शास्त्रीजींची महती विषद केली. या दोन्हा महामानवाचे जीवनपट मान्यवरांनी यावेळी उलगडलेत
महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गांचा अवलंब केला. त्यांना अखिल विश्वाला एक नवा आदर्श दिला. संत नरसी मेहता, संत तुकोबाराय यांचे अभंगही त्यांनी विश्वव्यापक केलेत. आज गांधीजींच्या विचारांवर जागतिक पातळीवर अभ्यास होत आहे. गांधीजी आणि शास्त्रीजी हे आपल्या देशाचे वैभव आहेत. असेही विचार मान्यवरांनी यावेळी मांडलेत.
कार्यक्रमाचे संचालन नितीन पेंदोर यांनी केले तर आभार कुणाल गेडाम यांनी मानले.यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे पालन करून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)