महिला राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रधानमंत्री यांना निवेदन

हाथरस प्रकरणी अपराध्यांना फाशी देण्याची मागणी

0

विवेक तोटेवार, वणी: उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे झालेल्या अमानुष कृत्याचाबाबत संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळत आहे. या घटनेत असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. याबाबतचे निवेदन वणी शहर महिला राष्ट्रवादी कांग्रेस यांच्याद्वारे मंगळवार 6 ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देण्यात आले आहे.

हाथरस येथे झालेल्या घटनेचा निषेध संपूर्ण देशात केला जात आहे. या घटनेत पीडितेचा मृतदेह हा परस्पर जाळण्यात आला व अत्याचारावर पांघरून टाकण्यात आल्याचा आरोप होत आहे. या घटनेची चौकशी करून आरोपी असणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. उत्तर प्रदेशात गुंडाराज वाढला आहे, महिला असुरक्षित आहेत. याकडे शासनाने लक्ष देणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. अशावेळी झालेल्या घटनेचा निषेध करीत व अपराध्यांना फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काॅंग्रेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सरसावल्यात. मंगळवारी उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी वणी शहर महिला कांग्रेस अध्यक्षा सौ सविता टेपाले, विजया अगबत्तलवार, पायल गणेश कोकास, मंदा शंकर दानव, वैशाली मोहन तायडे उपस्थित होत्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.