झरी-जामणी महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

घाटंजी येथील घटनेच्या निषेध केला व्यक्त

0

संजय लेडांगे, मुकुटबन: घाटंजी महसूल विभागातील महिला तहसीलदार व महिला कर्मचारी यांना पीककर्जबाबत अपमानास्पद वागणूक दिली. या घटनेचा निषेधार्थ झरीजामणी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काल 20 शुक्रवार ला एक दिवसीय कामबंद आंदोलन केले.

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी घाटंजी येथे पीक कर्जाबाबतच्या स्टेट बँक घाटंजी येथील सभागृहात महिला तहसीलदार व महिला कर्मचारी यांच्याशी अपमानजनक शब्दांचा वापर केला. याबाबत महसूल विभागात चांगलीच खळबळ उडाली.

या घटनेचा निषेधार्थ झरीजामणी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करून एक दिवसीय काम बंद आंदोलन केले. तर या निंदनिय घटनेबाबत माफी मागावी, अन्यथा हे आंदोलन बेमुद्दत करण्यात येईल. असा इशारा दिल.

या आंदोलनात नायब तहसिलदार महादेव गोलर, मंडळ अधिकारी बाळा गायकवाड, दिनेश पांडे, राजू मोरे, विजत सुत्रावे, संजय पोलेवार, राजू मसराम, निमेकर, पी. गोहणे, विजय येनुर्ले आदी महसूल विभातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.