वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान

नैसर्गिक आपत्तीचा वीज ग्राहकांना फटका

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान होत आहे. तर याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. सायंकाळ दरम्यान अचानक आभाळ येऊन जोरदार वारा वाहुन जोरदार पाऊस पडणे हे रोजचे झाले आहे. उन्हाळा सुरू असून उन्हाळा आहे की पावसाळा समजायला मार्ग नाही.

वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण चे तार तुटणे, इलेक्ट्रिक पोल जमिनीतून उखडून पडणे, डिस्क फेल होणे, डीपी जळणे, ट्रान्सफॉर्मर जळणे झाड पडून सिमेंट पोल तुटणे,केबल जळणे व इतर अनेक तांत्रिक बिगाड येणे नेहमीचे झाले आहे. ज्यामुळे विजवीतरण कंपनीचे नुकसान होऊन दिवसरात्र वितरणाच्या अधिकारी सह कर्मचाऱ्यांना दिवसरात्र भर उन्हात दुरुतीचे काम करावे लागत आहे. झरी तालुका अंतर्गत पाटण, झरी, मुकूटबन, अडेगाव, कायर घोंसा सबस्टेशन येत असून तालुक्यातील १०६ गावे या सबस्टेशनशी जुळलेले आहे.

घरगुती कनेक्शन शेतातील बोरवेयल कनेक्शन, जिनिग, व्यापारी, गावातील नळयोजना, डोलोमाईट कंपनी व इतर विविध ठिकाणी हजारो विद्युत कनेक्शन देण्यात आले आहे. मुकूटबन व तालुक्यातील इतर सबस्टेशन वर वणी व पांढरकवडा येथून विद्युत पुरवठा होत असून दोन्ही कडून येणाऱ्या सप्लायवर कुठेही बिगाड झाला की याची झड संपूर्ण तालुक्याला पोहचते. तसेच तालुक्यातील सबस्टेशन कडे जाणारी लाईन जंगलातून असल्याने वादळी वाऱ्यामुळे झाड तारावर पडून तार तुटणे, पोल पडणे होत असल्याने दिवसभर लाईन जाणे येणे करणे कमी दाबाचा पुरवठा होणे तर कधी दिवसभर तर कधी रात्रभर गर्मीत रहावे लागत आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे विजवीतरण कंपनीचे नुकसान होत आहे परंतु याचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहे. उपकार्यकारी अभियंता राहुल पावडे हे स्वतः उपस्थित राहून सहायक अभियंता पंकज नंदनवार अभियंता हेमंत लटारे कनिष्ठ अभियंता मालके प्रधान तंत्रज्ञ देवगडे व कर्मचारी यांना घेऊन २४ तास तालुक्यातील प्रत्येक समस्या मिटविण्याकरिता धावपळ करीत आहे. वीज पुरवठा खंडित होऊ नये याकरिता वीज वितरण कंपनीतर्फे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.