जुनाड खदाणीत एका कामगाराचा मृत्यू

मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील जुनाड खदाणीत एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत्यूचे कारण अस्पष्ट असले तरी तेथे काम करणाऱ्यांकडून वेगवेगळे तर्कवितर्क लावल्या जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मुकेशकुमार देवलसिंग सिग्राम (25) रा. छत्तीसगड हा गेल्या एक वर्षापासून आरपीएल कंपनीत मजूर म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास अचानक मुकेशकुमार हा खाटेवर पडलेला असल्याचे एका व्यक्तीस दिसून आले. त्याने व्यवस्थापकस याबाबत माहिती दिली. कंपणीचे व्यवस्थापक अनिलकुमार जैन यांनी घटनास्थळी जाऊन बघितले. त्यांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी वणी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मुकेशकुमार यास वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. पोलिसांनी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.