पुरुषोत्तम नवघरे, वणी: मकरसंक्राती निमित्त आज दुपारी 4 वाजता शहरात पतंग महोत्सव रंगणार आहे. नांदेपेरा रोडवरील जगन्नाथ नगरी येथे हा महोत्सव होणार आहे. शहरातील नवकार युवा गृपतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव सर्वांना खुला असून स्पर्धकांना कार्यक्रमाआधी जगन्नाथ नगरी येथे गोळा व्हायचे आहे. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिस असून पहिले बक्षिस 2100 रुपये मा. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्यातर्फे, द्वितीय बक्षिस 1500 रुपये आशिष मोहितकर तर तृतीय बक्षिस 1100 रुपये शैलेश ढोके यांच्याकडून दिले जाणार आहे. याशिवाय स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना उद्योजक किरण दिकुंडवार यांच्यातर्फे स्मृतीचिन्ह दिले जाणार आहे. शासनाने बंदी घातलेल्या नॉयलन धागा या स्पर्धेत वापरता येणार नाही, शहरातील अधिकाधिक लोकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन नवकार युवा गृपतर्फे करण्यात आले आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post
Comments are closed.