चोरीच्या उद्देशाने लपून बसलेल्या इसमाला अटक

जितेंद्र कोठारी, वणी : स्वतचे अस्तित्व लपवून चोरी सारखा गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या इसमाला शिरपूर पोलिसांनी अटक केली. विजय श्रावणलाल साहू (30), रा. अमराई वार्ड घूग्गुस, जि. चंद्रपूर असा आरोपीचा नाव आहे.

Podar School 2025

सोमवार 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता नाईट पेट्रोलिंग करीत असताना शिरपूर पोलिसांना मुखबिरकडून मुंगोली बस स्टॉप जवळ एक इसम अंधारात लपून बसल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. माहितीवरून पोलीस पथक पंचासह सोमवार रात्री 12 वाजता दरम्यान मुंगोली बस स्टॉप जवळ पोहचले. तेव्हा एक व्यक्ती अंधारात स्वतःचे अस्तित्त्व लपवून चोरी सारखा गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयीतरित्या बसून दिसला. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिसांनी पंचाच्या मदतीने इसमाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. त्या व्यक्ती जवळ पोलिसांना एक पेचकस व पाना मिळून आला. त्यामुळे सदर व्यक्ती चोरी सारखा कृत्य करण्याच्या उद्देशाने बसून असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. फिर्यादी नापोका अभिजीत कोषटवार यांच्या तक्रारीवरून आरोपी विजय श्रावणलाल साहू (30), रा. अमराई वार्ड घूग्गुस, जि. चंद्रपूर विरुध्द मपोका कलम 122 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

Comments are closed.