मुलीशी जबरदस्ती करायचा चाट, तक्रार करताच आरोपीची पडली खाट

अल्पवयीन मुलीची छेड काढणा-या आरोपीच्या आवळल्या मुसक्या

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील विरकुंड येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना 14 जुलै रोजी दुपारी 3 वाजता घडली. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, पीडिता ही विरकुंड येथील रहिवासी आहे. तर आरोपी अमित गजानन डवरे (21) हा सुद्धा विरकुंड येथेच राहतो. आरोपी हा पीडितेला तिच्या मोबाईलवर नेमही लज्जास्पद मॅसेज करीत होता. हा प्रकार गेल्या तीन महिन्यापासून सुरू होता. पीडिता ही अल्पवयीन असून 17 वर्षाची आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शेवटी पीडितेने 14 जुलै रोजी वणी पोलिसात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून वणी पोलिसात कलम 354 (ड), (2) सहकलम पोक्सो नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास एपीआय पिंगळे करीत आहे. आरोपीला आज 15 जुलै रोजी अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.